जागतिक महिला दिनानिमित्त शरद पवारांकडून महिलांचे कौतुक

Sharad Pawar

मुंबई :- आज ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day) म्हणून साजरा केला जातो. या दीनानिमित्त सर्वच स्तरावरुन महिलांच्या सन्मानासाठी शुभेच्छांचा वर्षाव होता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही महिलांच्या सन्मानार्थ ट्विट करत शुभेच्छा दिला आहेत.

स्त्रीच्या सर्जनत्वाचा आणि सृजनशीलतेचा, प्रतिकूलतेवर मात करून सातत्याने लढत राहण्याच्या तिच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचा, यशाची शिखरे पादाक्रांत करण्याच्या तिच्या साहसी वृत्तीचा, तिच्यात जागृत झालेल्या आत्मभानाचा व आत्मसन्मानाचा आज जागतिक महिला दिनानिमित्त गौरव करूया!, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER