शरद पवारांचा केंद्राविरोधात आक्रमक पवित्रा ; राष्ट्रवादीचा टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय

Sharad Pawar - PM Modi

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या मंत्र्यांची पहिली बैठक घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. बँकिंग कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली, राज्यातील जिल्हा व नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व नष्ट करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्याला उत्तर म्हणून राज्यात स्वतंत्र कायदा करता येतो का? केंद्र सरकार (Centre Govt) जे बदल करू इच्छित आहे, त्याला न्यायालयात आव्हान देण्यासाठी कोणते मुद्दे मांडले गेले पाहिजेत, यावर विस्तृत चर्चा करण्यासाठी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. यावरून पवारांनी केंद्राविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते .

काँग्रेस शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना एकत्रित घेऊन टास्क फोर्स स्थापन करायचा आणि राज्य सरकार कसा कायदा करू शकतो, यावर मंथन करण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात सहकार चळवळीवर आजही काँग्रेस-राष्ट्रवादीची पकड आहे. त्यावर आपले वर्चस्व मिळवता येत नसल्यामुळे भाजपने सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सुरू केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button