शरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता : संजय राऊत

Sanjay Raut & Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ‘यूपीए’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर विरोधकांची पुन्हा एकदा मोट बांधली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणालेत, “शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर बोलणं योग्य ठरेल.”

संजय राऊत म्हणालेत, “शरद पवार देशाचे नेते आहेत. त्यांच्याकडे राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. राजकारणातला दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि जनतेची जाण असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. देशाचे प्रश्न हाताळण्यासाठी त्यांचा अनुभव नक्कीच कामी येईल. यापुढील काळात देशाच्या राजकारणात काय बदल होतील हे आताच सांगू शकत नाही. ”

ही बातमी पण वाचा : केंद्र सरकारने शरद पवारांच्या नावाने योजना सुरु करून बहुमान मिळवावा संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER