शरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता : संजय राऊत

Sanjay Raut-Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले . शरद पवारांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे राऊत म्हणाले .

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी लेख लिहिला. त्यात काँग्रेसनं अन्याय केल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पटेल यांनी केलेल्या आरोपावर संजय राऊत यांनीही आपले मत मांडले .

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “पवारांवर काँग्रेसनं अन्याय केलाय, हे मी वारंवार म्हणत आलोय. शरद पवार हे देशातले गेल्या २५ वर्षांपासूनचे असे नेते आहे, ज्यांना पंतप्रधानपदाची संधी आधीच मिळायला पाहिजे होती. आज त्यांचं वय ८० झालंय. असे मोठे नेते लोकांमध्ये राहणारे, ते वयाच्या बंधनात अडकून पडत नाही. वयाच्या बेड्या त्यांना थांबवत नाहीत. ते धावत असतात, पळत असतात. देशाचं नेतृत्व करण्याची सर्वात जास्त क्षमता असलेले नेते कोणते असतील, सध्याच्या काळात, तर फक्त शरद पवार आहेत. पण, शरद पवारांचं कर्तृत्व हे त्यांच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरलं. कमी कुवतीच्या लोकांना शरद पवारांच्या कर्तृत्वाची कायम भीती वाटत आली. म्हणून उत्तरेकडील नेत्यांनी शरद पवारांना कायम अडथळ्यात टाकण्याचं काम केले .

शरद पवार केव्हाच पंतप्रधान व्हायला हवेत होते. पण होऊ द्यायचं नाही, या एका द्वेषापोटी शरद पवारांना कायम रोखण्यात आलं, असे राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘तुम्ही होता म्हणूनच…’ शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याबद्दल संजय राऊतांनी पवारांचे मानले आभार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER