पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

Sharad Pawar - PM Narendra Modi

मुंबई :- राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने देशभरातील दिग्गज नेते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले.

दरम्यान, गेली पाच दशके महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रात विशेष आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा पार्श्वभूमीवर सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये अशी विनंती पवार कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER