‘रिअल इस्टेट या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या’ शरद पवारांचं मोदींना पत्र

sharad pawar-pm modi

मुंबई : रिअल इस्टेट सेक्टर पूर्ण बिघडण्याच्या स्थितीत आहे. जवळपास तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कामगारांची कामे, रखडलेली कामे व विक्री यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होत नाही आहे. या आर्थिक घडामोडीने कंबरडे मोडले असल्याने याचा परिणाम जीडीपीने जो मोठा वाटा उचलला आहे त्यावर होत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात मांडले आहे.

कोरोनाच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन दरम्यान देशातील रिअल इस्टेट सेक्टरच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीआरईडीएआय) देखील यासंदर्भात एक पत्र लिहिले असून, पंतप्रधान यांनी त्वरित हस्तक्षेप करून रिअल इस्टेट क्षेत्राला सपोर्ट करावा, अशी विनंती केली आहे. याचा दाखलाही शरद पवार यांनी दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER