मराठी भाषेचा सन्मान जपणाऱ्या संस्था व मराठी मनांचा राबता वाढायला हवा ! – शरद पवार

sharad pawar wishes marathi language day

मुंबई :- महाराष्ट्रीयन मराठी भाषेचा आज गौरव दिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच, कवी कुसुमाग्रजांना अभिवादन करून शरद पवार यांनी मराठी भाषेचा सन्मान जपणाऱ्या संस्था आणि तिथला मराठी मनांचा राबता वाढायला हवा! असेही म्हटले आहे.

मराठी भाषा, मराठी उद्योग व उद्योजक, मराठी माणसं प्रगत व्हायला हवी. म्हणूनच मराठी मराठी भाषेचा सन्मान जपणाऱ्या संस्था आणि तिथला मराठी मनांचा राबता वाढायला हवा हे पवारांनी त्यांच्या ट्विटमधून सांगितले आहे.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. १९८७ साली शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून दरवर्षी कुसुमाग्रजांच्या वाढदिवशी मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा – राज ठाकरे