शरद पवारांनी दिल्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा

National Sports Day-Sharad Pawar

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या (National Sports Day) शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करतानाच खेळाडूंसाठी उत्तमोत्तम पायाभूत सुविधांची उपलब्धता व्हावी, देशी खेळांना व्यासपीठ मिळावे याचा निर्धार दृढ करूया. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट पवारांनी केले.

दरम्यान भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकी संघाचा दबदबा तयार करण्यात ध्यानचंद यांचा मोठा वाटा होता. १९२८, १९३२ आणि १९३६ अशा लागोपाठ ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याच कारणासाठी २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER