शरद पवार बळीराजासाठी पुन्हा मैदानात ; अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर

sharad-pawar-will-visit-marathwada.jpg

मुंबई : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत.

शेतकऱ्याच्या समोर ऐन हंगामात हातात आलेले पिकं डोळ्यसमोर पाण्यात वाहून गेले आहे. हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहे.

एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट आहे . तर दुसरीकडे अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे बळीराजाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली सोन्यासारखी ऊस, कापूस, तांदूळ, सोयाबीनची पिकं पाण्यात वाहून गेली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टी भागाचा आढावा घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचे नियोजन केले आहे.

शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे. उद्या अर्थात 18 ते 19 ऑक्टोबर दौरा करणार आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेताची पाहणी करणार आहे. पहिल्या टप्प्यात हा त्यांचा दौरा असणार आहे.

राज्यावर जेव्हा जेव्हा संकट परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER