शरद पवारांवर आणखी एक शस्त्रक्रिया होणार, राजेश टोपेंची माहिती

Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर एण्डोस्कोपी केली गेली. मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्यावरील ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आगामी काळात ते हळूहळू रिकव्हर होतील. तसेच पुढील काही दिवसांत पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर सुद्धा शस्त्रक्रिया केली जाणारअसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

सध्या शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही उद्या शस्त्रक्रिया केली असती तर त्यांच्या स्वादूपिंडाला आणखी सूज आली असती. त्यांच्या तब्येतीवर आणखी परिणाम झाला असता. त्यांच्या पित्तनलिकेच्या आतमध्ये जाऊन तो खडा काढून. यामुळे पवार यांच्या लिव्हरवरचा दाब कमी होणार आहे. त्यांना झालेला कावीळसुद्धा कमी होईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र पुन्हा एक शस्रक्रिया पार पड़ेल. यात गॉल ब्लॉडर काढण्याची शस्रक्रिया पार पडेल, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी ; सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार फोटोही केला शेयर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button