… शरद पवार ‘प्रॅक्टिकल’ निर्णय घेतील; फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : राष्ट्रावादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली – शरद पवार यांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा. शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी पवारसाहेब अहवाल वाचतील आणि प्रॅक्टिकल निर्णय घेतील. ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत.

भाजपाची भूमिका कायम सहकार्याचीच

मेट्रो प्रकल्पात राज्य सरकार इतकाच निधी केंद्र सरकारचाही आहे. केंद्राच्या मदतीने JICA ने या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. यापुढेही केंद्र सरकारची भूमिका सहकार्याचीच असेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि १०० कोटी रुपये खर्चही झालेत. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी असते, चर्चेतूचा मार्गही निघतो.

मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली, त्यापेक्षा एक इंच जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही, असा निर्णय करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आता दुराग्रह सोडून मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा, अशी आमची सरकारला विनंती, असे फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER