शरद पवार लवकरच यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारतील, राजदीप सरदेसाईंचे भाकीत

Rajdeep Sardesai - Sharad Pawar

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरही विरोधी पक्षांची मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने (Congress) गळ घातली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याची आणि यूपीएचे अध्यक्ष व्हावे अशी इच्छा काँग्रेसने व्यक्त केली आहे. त्यासाठी हालचालीही सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांनी महत्वाचे भाकीत व्यक्त केले आहे.

शरद पवार दोन दिवसानंतर ८१व्या पदार्पण करत आहे. लवकरच ते यूपीएचे अध्यक्ष बनू शकतात. ते सोनिया गांधी यांच्याकडे सूत्रे आपल्या हातात घेतील. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते, असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता आहे, असेही सरदेसाई म्हणाले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER