‘शरद पवार आगामी निवडणुका शिवसेनेसोबत लढणार नाही’, नारायण राणेंचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रिपणे अधिक जोमानं निवडणूक लढणार अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी पवार यांनी शिवसेनेचं कौतुक करत शिवसेना हा विश्वासपात्र पक्ष असल्याचेही म्हणाले. तसंच ठाकरे आणि मोदी भेटीवर बोलताना त्यावर किंचितहीशंका उपस्थित करण्याची नसल्याचं पवार म्हणाले. त्यावर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचा दावा राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणाले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणाले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसला एकप्रकारे सावध करण्याचा प्रयत्नही केला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button