शरद पवार पाळणार राजू शेट्टींना दिलेले वचन ; राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार निश्चित

Raju Shetti - Sharad Pawar

मुंबई : विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून अखेर नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूण 12 जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे या जागांवर राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

यापैकी एका जागेवर भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti), गायक आनंद शिंदे (Anand Shinde) आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे . यावरून राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे राशीजु शेट्टींना दिलेल्या वाचनाची पूर्ती करत असल्याचे दिसते .

दरम्यान आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरले होते. त्याविषयी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER