जन्मदिनी शरद पवार साधणार पदाधिकाऱ्याशी ऑनलाईन संवाद

Sharad Pawar

कोल्हापूर : माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांचा ८०वा वाढदिवस १२ डिसेंबरला होत आहे. बाजार समिती आवारात नव्याने सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे यानिमित्ताने उद्‌घाटन होणार आहे. यानंतर मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे सकाळी दहा वाजता एक हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शरद पवार ऑनलाईन संवाद साधणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुंबईतून शरद पवार राज्यभरातील कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या रॅलीत ३६ जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात कोल्हापुरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जळगाव येथून एकनाथ खडसे, नाशिक येथून ना. छगन भुजबळ, नागपूर येथून ना. अनिल देशमुख, बीड येथून ना. धनंजय मुंडे संबोधित करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER