भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री? शरद पवार परिस्थितीनुसार निर्णय घेतील; जयंत पाटलांचे विधान

मुंबई :- आज राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या स्थापनेला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २२ वर्षांच्या काळात राष्ट्रवादी पक्षातील घडामोडींची माहिती देत पक्षाची पुढील भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केली. या २२ वर्षांच्या काळात पक्षाध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असावा याबाबत सध्या काही सांगू शकत नाही.

मात्र त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून शरद पवार त्याबाबत निर्णय घेतील, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले. यावेळी पाटील म्हणाले, शरद पवारांनी नेहमीच सर्वसामान्यांना आणि तरुणांना राजकीय संधी उपलब्ध करून दिली. अनेक मोठे नेते त्यांनी घडवले. केंद्रात कृषिमंत्री असताना त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. देशातील सर्व नेते पवारांना मानतात. पवारांनी जनतेच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी पक्षाला अधिक बळकट करण्याचा आमचा निर्धार आहे.

पक्ष वाढवणे हीच प्राथमिकता असल्याचे पाटील म्हणाले. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असावा याबाबत काही महत्त्वाकांक्षी आहेत का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, घरात बसून अशा महत्त्वाकांक्षा करणे योग्य होणार नाही. ज्या पक्षाला जनतेने बहुमताने निवडून दिले त्याचाच मुख्यमंत्री होतो. मात्र त्यावेळी काय घडामोडी घडतात याचा विचार करून शरद पवार निर्णय घेतील, असेही जयंत पाटील म्हणाले.

सध्या महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, सामान्य लोकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. त्यांचे प्रश्न सोडवणे आणि महाराष्ट्रातील जीवनमान अधिक चांगले करणे हेच पक्षाचे ध्येय असणार आहे. भविष्यात शरद पवार केंद्रात मोठे पद भूषवतील का? या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे ते केंद्रात पद भूषवतील अशी परिस्तिथी आज तरी नाही. पवारसाहेब केंद्रात १० वर्षे महत्त्वाच्या पदावर होते. या १० वर्षांत त्यांनी कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी काय करू शकतो हे दाखवून दिले. त्यांनी आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. आज राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेक पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते इच्छुक आहेत. मात्र कोरोनाचा काळ असल्याने लोकांपर्यंत जाण्यावर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचे संकट संपल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत पोहचू, असेही जयंत पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीच्या नेत्याचा प्रतिसाद ; सांगलीला 25 लाखांचे तीन व्हेंटिलेटर दिले 

button color=”” size=”” type=”square_outlined” target=”” link=””]Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.[/button]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button