शरद पवारांनी केली हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस

Sharad Pawar - Maharashtra Today

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यासंदर्भात माहिती मिळताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवार यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, दिलीपकुमार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच, खार येथील हिंदुजा रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. दिलीपकुमार हे लवकर ठणठणीत होवोत, अशी प्रार्थना करत असल्याचेही शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button