…त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली ; जुन्या सहकाऱ्याच्या निधनाने शरद पवार हळहळले ; कुटुंबीयांना दिला ‘हा’ शब्द

Sharad Pawar

मुंबई :- शरद पवार (Sharad Pawar) यांचे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. याबाबत माहिती मिळताच जेधे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार आज थेट त्यांच्या गावी पोहचले. तिथे पवार यांनी सहवेदना व्यक्त करताना कुटुंबीयांना धीर आणि आधारही दिला. याबाबत पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. ‘पुण्याच्या भोर तालुक्यातील माझे जुने सहकारी संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या आंबवडे गावातील ग्रामस्थांची आज भेट घेऊन संपतरावांच्या निधनाबद्दल माझ्या सहवेदना व्यक्त केल्या’, असे पवार यांनी नमूद केले आहे.

ही बातमी पण वाचा : जुन्या सहकाऱ्याचे निधन, कुटुंबियांचे सांत्वन करतांना पवारांच्या डोळ्यात अश्रू

संपतराव जेधे यांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदारांसाठी, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंगाची आणि उन्हातान्हात पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. अशी निस्वार्थी, जीवाभावाची माणसे, हा आपला ठेवा असतो. संपतरावांच्या रूपाने हा ठेवा गेल्याचं मला दु:ख आहे. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की, संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन, असा शब्दच शरद पवार यांनी यावेळी जेधे कुटुंबाला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER