शरद पवारांनाही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली; परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar - Anil Deshmukh - Parambir Singh

मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तापदावरून हटवण्यात आलेले परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना महिन्याला १०० कोटींचं टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचंही नाव घेतलं आहे.

मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथं अँटीलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्या वेळेसच मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातलं. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांच्या चुकीच्या कृतीची माहिती दिली. तिथं उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना खरं तर ही माहिती आधीच होती असं माझ्या लक्षात आलं असल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून केला आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहिन्याला बार, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी पत्रातून केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर मोठी खळबळ माजली असूून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER