शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, तिसऱ्यांदा करण्यात आली शस्त्रक्रिया

Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल (Sharad Pawar was again admitted to the hospital) झाले आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी शरद पवार कालच रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर पुन्हा एकदा छोटी स्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास २१ दिवसात शरद पवारांवर ही तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर १२ एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती. त्याआधी शरद पवारांना ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं. ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर १२ एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button