शेतकरी हिंसक झाला तर जबाबदारी केंद्र सरकारची; शरद पवारांचा केंद्राला इशारा

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्धच्या आंदोलनात आतापर्यंत शांत असलेले शेतकरी हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजपा सरकारची असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील विविध सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आतापर्यंत ११ वेळा चर्चा झाली, तोडगा निघाला नाही. सरकार कृषी कायदे दीड वर्षासाठी स्थगित करण्यास तयार आहे; मात्र शेतकरी, हे कायदे रद्दच झाले पाहिजेत; तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, असे म्हणत आहेत.

उद्या ‘चक्का जाम’
शेतकऱ्यांनी आता उद्या (६ फेब्रुवारी) चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. शेतकरी देशातील सर्व राष्ट्रीय आणि राज्यातील मार्गांवर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. दुपारी १२ ते ३ दरम्यान हे आंदोलन होणार आहे.

ही योजना आहे की इच्छा ? अतुल भातखळकर
शेतकरी हिंसक झाला तर जबाबदारी केंद्र सरकारची, या शरद पवारांच्या इशाऱ्यावर टोमणा मारताना भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर म्हणाले – ही योजना आहे की इच्छा ? काहीही असली तरी ती पूर्ण होणार नाही, हे निश्चित.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER