आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम मी करतोय : शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र 60 वर्षांचा झालाय तर मी 80 वर्षांचा झालोय. आता या वयात नवं व्हिजन काय पाहणार. मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम मी करतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक गप्प का ? राम कदम

कारण नवी पिढी पुढे गेली पाहिजे त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे. मी आता तेच करतोय. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहात असतो. त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं आणि सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नसतं. त्यामुळे तुमचा मान राहात नाही. असंही त्यांनी स्पष्टपणे सांगत नव्या भूमिकेचे संकेत पवारांनी दिले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदम्यानही त्यांनी सक्रिय निवडणुका आता लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या आणि नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणे योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचे आणि ते काय करतात ते बघायचे. त्यांच्या कामात फार काही हस्तक्षेप करायचा नाही. कारण न विचारता सतत सांगत गेले की मान राहात नाही असेही त्यांनी सांगितले .