२२ जानेवारीला शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर : कार्यक्रमाची जय्यत तयारी

SHarad Pawar.jpg

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार (Sharad Pawar) २२ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तयारीचा भाग म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी -अधिकाऱ्यांची बैठक, पोलीस ग्राउंड मैदानाच्या पाहणीसह तयारीचा आढावा घेतला. याबाबत अधिक माहिती अशी, २२ जानेवारीला पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारलेल्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्याचा १० कोटी रुपये खर्चाच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ व आरोग्य विभागाच्या ३९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत. तसेच पालकमंत्री व गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER