शरद पवार काढणार ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यावर तोडगा

Sharad Pawar

पुणे : राज्य सहकारी साखर संघा बरोबर आज झालेल्या बैठकीत साखर संघाच्या वतीने ऊस तोडणी कामगार, मुकादम ,वाहतूकदारांच्या कराराबाबत कुठलाही ठोस प्रस्ताव न दिल्याने सीटूप्रणित महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटने सह सर्व कामगार संघटनांनी तातडीने प्रस्ताव द्या अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा दिला. साखर कारखाना संघ मजुरी दरवाढ कमिशन दरवाढ व विमा याबाबत सकारात्मक असल्याचे सांगून सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर शरद पवार साहेब यांचेबरोबर ऊसतोडणी कामगार संघटनांची बैठकही घडून आणली जाईल व कराराबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले .

बहुसंख्य संघटनांनी लवाद नको अशी मागणी करून कामगार संघटना बरोबर चर्चा करून करार करावा अशी आग्रही भूमिका मांडली. बैठकीसाठी , उपाध्यक्ष श्रीराम शेटे,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रात 20 टक्के कमिशन मिळते ते 25 टक्के करण्यात यावे अशी सर्व संघटनांची मागणी आहे. ऊस तोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार साठी कल्याणकारी महामंडळाचे कामकाज तातडीने सुरू करावे.

बांधकाम कामगार कल्याण मंडळ तसेच माथाडी कामगार कल्याण मंडळ हे प्रयोग आपल्या राज्यात यशस्वी झालेले आहेत त्याच धर्तीवर ऊस तोडणी कामगारांच्या महामंडळाचे कामकाज करा. ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसाठी पद्मश्री डॉक्टर विखे पाटील अपघात विमा योजना लागू आहे.कारखाना स्थळावर या कामगारांसाठी मोफत वैद्यकीय उपचाराची व बैलांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात यावी. ऊस तोडणी कामगार च्या मुला मुलींसाठी त्यांच्या गावी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आदी मागणी डॉ. डी एल कराड ,जीवन राठोड,गहिनीनाथ थोरे,प्रा. जाधव ,सुशिला मोराळे, केशवराव आंधळे ,श्रीमंत जायभाय, गहिनीनाथ थोरे, जीवन राठोड, प्राध्यापक सुभाष जाधव ,सुशीला मोराळे ,प्रदीप भांगे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER