शरद पवार घेणार राजनाथ सिंग यांची भेट; कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावर होणार चर्चा?

Rajnath Singh - Sharad Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज सकाळी 11 वाजता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत देशात सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावर चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील विमानतळवर ही भेट होणार आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यासाठी आज भारत बंदची हाकही देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनीही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला आहे.

कृषीविधेयक तातडीने रद्द करावे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. याविषयी बोलताना त्यांनी राज्यभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER