शरद पवार शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी घेणार राष्ट्रपतींची भेट

Ramnath Kovind & Sharad Pawar

मुंबई : कृषी कायदे रद्द करा, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पाच वेळा बैठक झाल्या. तोडगा निघाला नाही. या विषयावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेणार आहेत.

चर्चेच्या पाचव्या फेरीतही केंद्राकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शरद पवारांसह विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पवार राष्ट्ररतींची भेट घेतील, असे कळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER