शरद पवार यांना मिळणार यूपीएचे अध्यक्षपद ! राजकीय हालचाली वाढल्या

Sharad Pawar

नवी दिल्ली :- राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची यूपीएच्या अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता त्या दिशेने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

असे झाल्यास शरद पवार हे काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जागा घेऊ शकतात. महाविकास आघाडीप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न आता राष्ट्रीय पातळीवर सुरू झाले आहे.

भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत आहे. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा आहे. शरद पवार ही निवड स्वीकारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांच्या माध्यमातून यूपीए अधिक बळकट करण्यासाठी ही राजकीय खेळी असणार आहे. महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार यांनी चमत्कार करून दाखवला आहे. शक्य नसताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत भाजपला विरोधी पक्षात बसवले आहे. तसेच पवार हे यूपीएतील घटक पक्षांचे नेतृत्व करू शकतात.  त्यामुळे ही मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. भाजपला रोखण्यासाठी आणि सक्षम पर्याय देण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

झी-२४ तासचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे यांनी ही माहिती दिली आहे.

ही बातमी पण वाचा : २०२४ मध्ये शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार, काँग्रेसचा प्रस्ताव? 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER