‘व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या’, पवारांनी केंद्राला ठणकावले

Sharad Pawar-Piyush Goyal.jpg

नवी दिल्ली : कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतली. या प्रश्नी त्यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्याशी तातडीनं चर्चा केली. ‘अशा आकस्मिक निर्णयामुळं निर्यातदार देश म्हणून भारताच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच कांदा निर्यातीबाबत निर्णय घेताना व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या, असं मत व्यक्त केलं.

ही बातमी पण वाचा:- कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शरद पवार सक्रिय, केंद्राला दिला ‘हा’ सल्ला

भेटीदरम्यान, शरद पवार यांनी पियुष गोयल यांना शेतकऱ्यांची स्थिती आणि या निर्णयाच्या होणाऱ्या दुष्परिणामाबाबतही माहिती दिली. ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी करण्याचा प्रस्ताव दिला. याच आधारावर केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. यावर शरद पवार म्हणाले, “मोठ्या प्रमाणात शेतकरी अल्पभूधारक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “केंद्र सरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक क्षेत्रात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याशी काल रात्री संपर्क करून केंद्र सरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली. या विनंतीला अनुसरुन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की, हा कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर आला आहे. या संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय या तिन्ही मंत्रालयांशी चर्चा करून आम्ही या निर्यातबंदीचा फेरविचार करू व जर एकमत झाल्यास याबाबतीत पुनर्निर्णय घेऊन असं मा. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER