समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची – शरद पवार

Pawar Sharad

सातारा: सध्या जग रोज नव्या बदलांना समोर जात आहे. अनेक गोष्टी समाजात निसर्गाच्या विरुद्ध  घडताना दिसत आहेत. समाजासमोर दररोज नवनवीन अडचणी उभ्या राहात आहेत. त्यामुळे जगाला, समाजाच्या नवीन गरजांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांंची शिक्षणाप्रती आस्था वाढवून समाजाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे केले.

शरद पवार म्हणाले,  वातावरणातील बदलाने दररोज जगासमोर वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत. समाजाला या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बदलत्या समाजाच्या व विविध क्षेत्रांच्या  गरजा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षण संस्थांसमोर आहे. मोठ्या आशेने समाज यासाठी शिक्षण संस्थांकडे पाहात आहे. त्या पूर्ण करणारे शिक्षण हे संस्था व विद्यापीठांनी द्यावे. परदेशात संशोधन करताना विद्यार्थी आणि शिक्षक हातात हात घालून काम करतात. आपल्याकडे मात्र तिथे दरी दिसते, अशी खंतही पवारांनी बोलून दाखविली.

शरद पवारांची नाराजी पत्करून उद्धव यांनी काय साधले?

रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातारा येथे उभारण्यात आलेल्या ‘रयत सायन्स अँड इंनोव्हेशन अ‍ॅक्टिविटी सेंटर’, आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण, उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अनिल काकोडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, भाऊसाहेब कराळे, अनिल मानेकर, प्रतिभाताई पवार आदी उपस्थित होते.