सदिच्छा देणाऱ्यांचे शरद पवारांनी मानले आभार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती रविवारी सायंकाळी बिघडली. राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली, त्यांना सदिच्छा दिल्यात. यासाठी पवारांनी त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि लता मंगेशकर यांचे आभार मानले आहेत. पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पवार म्हणालेत, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मन:पूर्वक आभार!” “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार!” अशा शब्दात पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

लता मंगेशकरांचे आभार
“माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दीदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लतादीदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्यासोबत आहेत. त्यांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. ” असंही पवार यांनी म्हटलं आहे.


सर्व कार्यक्रम रद्द
रविवारी सायंकाळी पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयाचं निदान झाल्यानंतर पवारांवर आता शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ३१ मार्च रोजी पवार रुग्णालयात दाखल होणार आहेत. दरम्यान, प्रकृतीच्या कारणामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button