शरद पवारांनी घरीच घेतली कोरोनाची दुसरी लस, केले आवाहन…

Sharad Pawar Get Vaccineted - Maharastra Today
Sharad Pawar Get Vaccineted - Maharastra Today

मुंबई : गेल्या वर्षी संपूर्ण जगात हाहाःकार मजवणाऱ्या कोरोना व्हायरसने आतपर्यंत लाखो लोकांचे प्राण घेतले. या धोकादायक विषाणूवर मात करण्यासाठी अनेक देशांनी लस शोधली आहे. शिवाय लसीकरणाला सुरूवात देखील झाली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोज घेतला होता. त्यानंतर आज सकाळी पवार यांनी घरीच कोरोना लसीचा दुसरा डोज घेतला. याबाबतची माहिती खुद्द शरद पवार यांनी ट्विटरवरुन दिली.

आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने व त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार!, असे ट्विट पवार यांनी केले आहे.

योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच संपूर्ण जग गेले वर्षभर कोरोना विषाणूशी लढा देत आहे. बदलत्या परिस्थितीत आव्हानांना सामोरं जाताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा, असे म्हणत त्यांनी जनतेला सुखी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button