शरद पवार रुग्णालयात असतानाही काळजी करतात बारामतीची !

Maharashtra Today

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार(Sharad pawar) शस्त्रक्रियेनंतर मुंबईत विश्रांती घेत आहेत. मात्र याही स्थितीत त्यांचे लक्ष बारामतीकडे (Baramati) असल्याचे एका प्रसंगातून दिसले. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव(Sadashiv Satav) यांनी पवारांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना स्थितीची माहिती घेत बारामतीकरांची चौकशी केली.

बारामतीत मागील दोन महिन्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. रोज किमान तीन-चारशे नवे रुग्ण आढळत असल्याने बारामतीकरांसह प्रशासनाचीही चिंता वाढली होती. बारामतीत पाच मेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. केवळ औषधाची दुकाने आणि रुग्णालये सुरु आहेत.

या काळात शरद पवार यांनी दोन वेळा बारामतीकरांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले होते. त्याच वेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या. त्यामुळे ते सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक येथे निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.

लॉकडाऊनमुळे फरक पडला का?

बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. शरद पवार यांनी बारामतीत कोरोना निर्मूलनाबद्दल सुरु असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती घेतानाच लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत काही फरक पडला का, याबद्दलही त्यांनी विचारपूस केली. बारामतीत आरोग्य यंत्रणा राबवताना काहीही मदत लागली कळवा, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button