शरद पवार यांनी ड्रग्जच्या प्रश्नावरून मुंबई पोलिसांना दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची (sushant-singh-rajput case) चौकशी करत असताना तपासामध्ये ड्रग्जप्रकरणही समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ड्रग्जच्या या प्रश्नावरून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सल्ला दिला आहे. पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘सुशांत सिंह प्रकरणामुळे समोर आलेल्या ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.

तरुण पिढीमध्ये अशी व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे थांबायला हवं. यात तरुणांचे पालक व मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.’ असे ट्विट पवारांनी केले आहे .सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणात ड्रग्ज वापराचे व्हॉट्सऍप चॅट समोर आल्यानंतर सीबीआयच्या तपासात ड्रग्जचा अँगल समोर आला, मग मुंबई पोलिसांनी एवढे दिवस नेमका काय तपास केला? असा सवाल भाजपने उपस्थित केला.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी आधी मुंबई पोलिसांकडे होती; पण हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला. यानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात केली. मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू असतानाच ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता. ईडी आणि सीबीआयच्या चौकशीमध्ये ड्रग्जचा अँगल समोर आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER