राष्ट्रवादीला चांगली खाती मिळाली हे शरद पवारांचे यश – हसन मुश्रीफ

Hasan Mushrif-Sharad Pawar

नगर :- “विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कितीही टीका केली तरी शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असेपर्यंत महाविकास आघाडी सरकारचं काही होणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार, त्यांनी केलेली कामे हीच आपली मोठी संपत्ती आहे. कुणाजवळ काहीही असो ‘हमारे पास पवार साहब है’.

राष्ट्रवादीला चांगली खाती मिळालेली आहेत हे शरद पवार यांचे यश आहे.” असे वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये झाली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजपा व शिवसेना महायुतीच्या बाजूने लागल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसण्याची तयारी केली होती. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन वळवून तीन पक्षांचे सरकार तयार केले.

ही बातमी पण वाचा : राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये येणार, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

या सरकारमधील महत्त्वाची खातीही आपल्या पक्षाच्या पदरात टाकून घेतली हे शरद पवारांचे यश आहे, असेही ते म्हणाले. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाडाची काडे करून पक्ष वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे राज्यातील सरकार आणण्यात नगर जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. यापुढेही आपण असेच जोमाने काम करून इतर लहान-मोठ्या निवडणुकांत बाजी मारणार आहोत, असे ते म्हणाले. ‘राज्यातील विविध समित्यांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडली आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकांना सरकार आपले वाटत नव्हते. लोकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर लोकांना सरकार आपले वाटेल. पैसे देऊन काम होते हा विचार लोकांच्या मनातून काढून टाका. लोकांना हे सरकार आपले कसे वाटेल असे काम करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पवारांची औलाद आहो, गद्दारी केल्यास गाठ माझ्याशी आहे – अजित पवार


Web Title : Sharad Pawar’s success that NCP has got good accounts – Hasan Mushrif

Maharashtra Today : Online Marathi News Portal