….अन् शरद पवारांनी रस्त्यावर ताफा थांबवून दिला नवदांपत्याला आशीर्वाद

Sharad Pawar Blessed The Newly Married Couple

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे दौऱ्यावर असताना लोक जागोजागी थांबून आपुलकीने त्यांची भेट घेण्यासाठी येतात. शरद पवारही भेटायला आलेल्यांना कधी नाराज करत नाहीत. असाच प्रसंग नुकताच सोलापूरमध्ये पहायला मिळाला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके यांच नुकतंच निधन झालं असून त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार पंढरपुरात होते. सरकोली या गावी जाण्यासाठी शरद पवारांचा ताफा निघाला होता. मात्र शरद पवार यांनी इतक्या गडबडीतही ताफा थांबवून भेटायला आलेल्या नवदांपत्याला आशीर्वाद दिला.

ढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील सूरज नवनाथ शिंदे व काजल हरी क्षिरसागर यांचा गुरुवारी विवाहसोहळा पार पडला. यानिमित्ताने दांपत्य ग्रामदैवताच्या दर्शनाला चालले होतं. याचवेळी शरद पवारांचा ताफा तेथून चालला होता. त्यामुळे दांपत्य शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबले. शरद पवारांनी यावेळी त्यांना नाराज न करता ताफा थांबवला आणि आशीर्वाद दिला. यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER