‘सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात, या आशेने शरद पवारांनी निर्णय बदलला’

supriya-sule-on ncp Sharad pawar

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ऐनवेळी शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा ‘पॉवर ट्रेडिंग’ या पुस्तकात करण्यात आला आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री (Maharashtra FirstLady CM)करण्याचे शरद पवार यांचे आधीपासूनच स्वप्न आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकार टिकले तर आपले हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे, याची जाणीव शरद पवार यांना झाली. त्यामुळेच शरद पवार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला, असे ‘पॉवर ट्रेडिंग’च्या लेखिका प्रियम गांधी यांनी सांगितले. प्रियम गांधी यांनी बुधवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार कसे स्थापन झाले याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

ही बातमी पण वाचा : पुणे पदवीधर मतदारसंघ : राष्ट्रवादीने निवडणुकीआधीच मान्य केला पराभव – फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER