
मुंबई : नव्या शेतकरी कायद्यांविरोधात (farmer Act) गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. या आंदोलनादरम्यानच आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक ट्विट केले.
अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो. pic.twitter.com/3CWWLuHrdV
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 23, 2020
अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो , असे ट्विट करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सरकारवर टीका केली.
दरम्यान या अगोदर शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना शरद पवारांनी सल्ला दिला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला