शरद पवार, सोनिया गांधी उद्धव ठाकरेंवर नाराज नाहीत- संजय राऊत

Sharad Pawar - Sonia Gandhi - CM Uddhav Thackeray - Sanjay Raut

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) कार्यालयावर अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याने महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) नाहक बदनामी होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती पुढे आली होती. तसेच काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर बोलून नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. मात्र शिवसेनेकडून (Shiv Sena) याचे खंडन करण्यात आले आहे.

काल रात्री शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, कंगनावर कारवाई करण्याचा तुमचा टायमिंग चुकला. मुंबईत अनेक अवैध बांधकामे आहेत. अशा कारवाईमुळे निष्कारण शंकेची पाल चुकचुकते, अशा शब्दांत पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती राऊतांनी देण्यास टाळाटाळ केली. मात्र शरद पवार आणि सोनिया गांधी मुख्यमंत्र्यांवर नाराज नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ‘सोनिया, पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका. कंगना हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरून गेलो. नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलो आहे. ती काय ट्विट करतेय ते वाचलं नाही, आम्ही फक्त सामना वाचतो. तसेच कंगनाबद्दल यापुढे बोलायचं नाही, असा निर्णय घेतला.’ अशी माहिती राऊतांनी प्रसारमाध्यमांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER