सहा वर्षे सत्तेत असूनही काहीही करु शकले नाही? पवारांचा मोदी सरकारवर टोलेबाजी

Sharad Pawar - Narendra Modi

पुणे :- केंद्र सरकारमध्ये सहा वर्षांपासून सत्तेत असताना देखील ते चुका दुरुरत करु शकले नाहीत. त्यामुळे यावर चर्चा काय करायची, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) लगावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) याच्या दरात सुरु असलेल्या वाढीवरुन त्यांनी मोदी सरकारला (Modi Government) टोला लगावला.

केंद्र सरकार सहा वर्षे सत्तेत असताना देखील चुका दुरुस्त करु शकत नसेल तर त्यावर चर्चा काय करायची, असा प्रश्न शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना केला. दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. त्याविषयी विचारले असता असता शरद पवार पवार यांनी मोदी सरकारला टोला लगावला. केंद्रात गेली सहा वर्ष यांचे सरकार आहे. आमच्याकडून चुका झाल्या तर त्या सहा वर्षात दुरुस्त करता आल्या नाहीत का? असा सवाल पवारांनी केला.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER