‘शरद पवारांनी विरोधी पक्षाचं, तर राहुल गांधींनी काँग्रेसच नेतृत्व करावं’, – संजय राऊत

Sanjay Raut - Sharad Pawar - Rahul Gandhi

मुंबई :- प्रत्येक घराण्याच्या नावाने पक्ष चालत असतो. गांधी आडनावाने जसा काँग्रेस (Congress) पक्ष चालतो तसेच ठाकरे आडनावाने शिवसेना (Shiv Sena) चालते. प्रत्येक घराणं हा त्या पक्षाचा चेहरा असतो. देशासाठी काँग्रेसचे मोठे योगदान असून, गांधी कुटुंबाने देशाचं नेतृत्व करावं अशी जर जनतेची भावना असेल तर त्याचा सन्मान राखला पाहिजे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर अपशब्दात टीका करणं चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपला (BJP) लगावला. राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असं भाकीतही त्यांनी व्यक्त केलं.

यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक पक्षात वाद असतात. भाजपमध्येही (BJP) होतं. समजावादी पक्षातही होतं. काँग्रेसमध्ये असेल तर बघिडले कुठे? पक्षात द्वंद्व असणं हे लोकशाहीचं लक्षण आहे, असं सांगतानाच काँग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे, काँग्रेसमध्ये राहुल गांधींव्यतिरिक्त दुसरा नेता नाही असे मी म्हणणार नाही. गांधी आडनावाने जसा काँग्रेस पक्ष चालतो. त्यामुळेराहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व करावं असे माझे मत आहे. राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) विरोधी पक्षाचं तर राहुल गांधींनी काँग्रेसच नेतृत्व करावं, असं मतही व्यक्त केले.

राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकश्यांवरून राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्रास देण्यासाठीच तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर केला जात आहे. केवळ त्रास देण्यासाठीच या यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

ही बातमी पण वाचा : पवारांचा शिवसेनेला धक्का, कट्टर शिवसैनिक महेश कोठे १० ते १२ नगरसेवकांसह उद्या राष्ट्रवादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER