मराठा संघटना आक्रमक; पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Sharad Pawar

सातारा:  महाराष्ट्राच्या उभारणीत शरद पवार(Sharad Pawar) यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, मराठा आरक्षणाविषयी ते सध्या काहीच भूमिका स्पष्ट करत नाहीत, असे वक्तव्य मराठा आरक्षण (maratha-reservation) संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी केले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. जेणेकरून मराठा समाजाला आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करता येईल, असे मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २ नोव्हेंबरला सातारा येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत मराठा आरक्षणाची पुढची दिशा काय असावी, याबाबत चर्चा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती सुरेश पाटील यांनी केली. त्यामुळे आता शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी चार आठवड्यांवर पुढे ढकलली आहे. सुनावणीदरम्यान राज्य सरकारचे वकील अनुपस्थित राहण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मला नेमका काय गोंधळ उडाला याची कल्पना नाही. माझ्या माहितीप्रमाणे कोर्टात खूपदा मोठ्या वकिलांच्या वेळा परिस्थितीनुसार ठरवल्या जातात. वकील सुरुवातीला नव्हते; पण त्यानंतर अर्ध्या तासाने ते आले. युक्तिवाद झाला. चर्चा झाली. न्यायाधीशांनीही विषय  घेतला, त्यावर निर्णय दिला. त्यामुळे त्याच्यावर टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही, असे शरद पवारांनी यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘पंकजा चांगलं काम करत आहेत’, पवारांच्या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.