…शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा हल्ला

Maharashtra Today

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. शरद पवार यांना या सगळ्याची कल्पना होती, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ‘ … तर आदरणीय शरद पवारांनाही (Sharad Pawar) जाब विचारायला हवा’ असा सरळ हल्ला केला आहे.

निरुपम म्हणालेत, परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का? काँग्रेसने या बाबत ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाचा घेतला समाचार

केरळमधील काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी १० मार्चला पक्षाला रामराम केला. चारच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी राजकारणात तिसऱ्या आघाडीबद्दल शरद पवार म्हणाले होते, देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. यासंदर्भात काही नेत्यांशी माझं बोलणं झालं आहे. सीपीआय एमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. यावर निरुपम यांनी ‘तिसरी आघाडी हेच करणार आहे का’ असा प्रश्न करून पवारांना टोमणा मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER