पत्रकारांच्या प्रश्नांवर शरद पवार म्हणाले “इनफ इज इनफ”

Sharad Pawar - Maharastra Today

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घटनाक्रमच विशद केला. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख या काळात रुग्णालयात असल्याचे कागदपत्रंही त्यांनी सादर केले.मात्र पवारांचा दावा खोटा ठरला .

गृहमंत्री फेब्रुवारीच्या 15 ते 27 या तारखेपर्यंत हे कोरोनामुळे विलगीकरणात होते, असं शरद पवारांनी सांगितलं. मात्र, यावेळी पत्रकारांनी त्यांना सांगितलं की शरद पवार हे 15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत होते. तसा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊण्टला आहे. यावर शरद पवार संतापले आणि “इनफ इज इनफ” म्हणाले .

सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरुन 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होम क्वॉरंन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता, असे शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारीचा पत्रकार परिषदेतील व्हिडीओ शेअर एक ट्वीट केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER