शरद पवारांचा झंझावाती दौरा ; साताऱ्यात कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

Sharad pawar

सातारा :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट भीषण आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार अनेक ठिकाणी कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आज सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा शहर तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत. त्यांच्या सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) देखील आहेत.

सकाळी साडे दहाच्या सुमारास शरद पवार यांचे साताऱ्यात आगमन झाले आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख शासकिय अधिकारी यांच्याकडून ते सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

साताऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. तसंच रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी वरवर वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर ते आज साताऱ्यात येऊन लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांचा आढावा घेतील तसंच काही महत्त्वाच्या सूचना करतील.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER