शरद पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Jitendra Awhad - Joe Biden

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव करत जो बायडन (Joe Biden) विजयी ठरलेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे .

या ट्विटमध्ये आव्हाडांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा साताऱ्याच्या पावसातील सभेचा फोटो आणि बायडन यांचा फ्लोरिडातील फोटो शेअर केला .याला फोटोसंदर्भात आव्हाड लिहितात, पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतसुद्धा यशस्वी ठरलाय.

अखंडपणे केलेले कठोर परिश्रम आणि वचनबद्धता विजयी होते. आशा जिवंत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी चांगलाच जोर लावला होता. यावेळी फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस असतानादेखील त्यांनी सभा घेतली होती, हे विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER