बिहार निवडणूक : अन्य पक्षातील नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर, तर १५० जागांवर लढण्याचा निर्णय

Sharad Pawar

मुंबई : आगामी बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) महाआघाडीकडे जागावाटपाबाबत केलेली मागणी मागणी नाकारल्यामुळे नाराज राष्ट्रवादी कॉंग्रेसने बिहारमध्ये स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण २३३ जागांपैकी १५० जागेवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला आहे. पक्षाने पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी ३२ मतदारसंघासाठी उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.

“उर्वरित जागांच्या उमेदवारांची यादी बिहारचे पक्षाचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी सल्लामसलत करून पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल,” असे राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मीडिया प्रभारी कुमार ज्ञानेंद्र यांनी सांगितले.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, जर १२ मतदारसंघात किमान चार जागा मिळाल्या असत्या तर.राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीत जाण्यास इच्छुक होती. मात्र काँग्रेसने आमची मागणी मान्य केली नसल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कॉंग्रेस राष्ट्रवादीला सामावून घेण्यास तयार होती, पण नंतरच्या काळात केवळ दोन जागांची ऑफर नाकारल्या नंतर बोलणी फिस्कटली.

“कॉंग्रेसने आमच्या प्रस्तावाला प्रतिसाद देण्यास उशीर केल्यामुळे उमेदवारांची पहिली यादी घाईघाईने जाहीर करण्यात आली. काही माजी आमदार आणि अन्य पक्षांचे प्रमुख नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात आणि पक्षाच्या चिन्हावर दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील निवडणुका लढवू शकतात, अशी माहिती ज्ञानेंद्र यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER