शरद पवारांनी साताऱ्यातील सभेच्या आठवण ; भर पावसात जयंत पाटलांची सभा

Jayant Patil - Maharastra Today

पाढंरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलीच रंगात आली आहे . भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी मोठ्या तयारीने कामाला लागले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. काल (11मार्च) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. भर पावसात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभा दणाणून सोडली आहे. त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झालीये. जयंत पाटलांच्या या सभेच्या निमित्ताने पवारांनी साताऱ्यातील सभेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत .

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2019 साली शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. अंगावर कोसळणारा पाऊस, डोक्यावर विजांचा कडकडाट असा सगळा माहोल असताना तसूभरही विचलीत न होता पवारांनी ही सभा दाणाणून सोडली होती. 80 वर्षीय शरद पवार यांची ही सभा ऐतिसहासिक असल्याचे अजूनही सांगितले जाते. त्यांच्या याच सभेमुळे बेडे नेते सोडून गेलेले असूनसुद्धा राष्ट्रवादीने 2019 च्या विधानसभेत मोठी कामगिरी करुन दाखवली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनांतनर पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीर जयंत पाटलांनीसुद्धा भर पावसात जंगी सभा घेतली आहे. जयंत पाटील सभेत भाषण करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजासुद्धा कडाडत होत्या. मात्र, डोक्यावर पावसाच्या धारा पडताना जयंत पाटीलसुद्धा तसेच उभे राहिले .आणि आपले भाषण पूर्ण केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button