शरद पवार मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार

CM Uddhav Thackeray - Sharad Pawar

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार असल्याची माहिती आहे.

कांजूर मार्ग मेट्रो कारशेड (Kanjurmarg Metro Car Shed) प्रकल्पावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपला (BJP) चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन करण्यासाठी मोठी भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील, अशी माहिती मलिक यांनी दिली.

दरम्यान कांजूर मार्गच्या जागेवर राज्य सरकारने मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय घेतल्यावर केंद्राकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. ती जागा मिठागराची असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आलंय. तसंच काही पर्यावरणवादी आणि खासगी मालकीच्या लोकांनी या जागेवर कारशेड उभारण्यास विरोध केला. त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. “केंद्राचे आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पर्यायाने भाजप नेत्यांना चर्चेचे आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER