पीडित मुलीचा मृतदेह कुटुंबियांना दिला का नाही ? शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar

मुंबई : हाथरसमध्ये (Hathras-case) एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले . ते पुण्यात बोलत होते.

हाथरसमध्ये त्या युवती बरोबर बलात्कार झाला नाही, असं पोलीस आयुक्तांचं म्हणणं ऐकलं. पण तिची हत्या तर झाली आहे. मग तिच्या मृतदेह पालकांच्या ताब्यात का दिला नाही? असा सवाल पवारांनी उपस्थित केला . उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन कसे वागतात? कायद्याचं राज्य, मूलभूत अधिकार यावर तुमचा कवडीचा विश्वास नाही, असं दिसतं, असं पवारांनी नमूद केलं. दुर्दैवाने महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे घडत असताना राज्य सरकाराची भूमिका ही फक्त बघ्याची आहे, असे पवार म्हणाले.

हाथरससारखा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप उमटलेला असून जनतेची रिअ‌ॅक्शन योग्यच आहे,असे पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER