शरद पवार थेट नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर, शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन

Sharad Pawar-Damage Crop

उस्मानाबाद : गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) हे रविवारपासून मराठवाड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते तुळजापुरातील काकरंबा इथं दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी (damaged agricultural) केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारांना गराडा घातला. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा अश्या सूचना त्यांनी केल्या. मात्र यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. शासनाकडून तात्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पवारांना केली. यावर पवारांनी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सोमवारी सकाळी विमानाने सोलापूरला पोचतील. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सोमवारपासून तीन दिवस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. बारामतीपासून ते दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडामार्गे ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर २० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER